बेळगाव : 8 ठिकाणी घरफोडी, सराईत चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

बेळगाव : 8 ठिकाणी घरफोडी, सराईत चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

belgavkar.com | belgaum | belgavkar

169 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 100 ग्रॅम चांदीच्या वस्तू जप्त केल्या

बेळगाव : संकेश्वर व हुक्केरीत प्रत्येकी 4 ठिकाणी घरफोडी प्रकरणात हात असलेल्या सराईत चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. संकेश्वर व हुक्केरी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 169 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 100 ग्रॅम चांदीच्या वस्तू जप्त केल्या. याची किंमत 11 लाख 18 हजार 500 रू. होते.
हुक्केरी व संकेश्वर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत या चोरट्याला जेरबंद केले. त्याने या परिसरात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर संकेश्वर व हुक्केरी पोलिसांत प्रत्येकी चार गुन्हे दाखल आहेत. गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर शहरातील फकीरप्पा कांबळे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. 1 मार्च 2023 ला रात्री हुक्केरी तालुक्यातील निडसोसी येथे घरफोडी झाली होती. त्याची फिर्याद संकेश्वर पोलिसात झाली होती. गत सहा महीन्यात तालुक्यात हुक्केरी परीसरात चार व संकेश्वर परीसरात चार घरफेडीची प्रकरणे दाखल झाली होती.

belgaum police succeeded in nabbing thief who was involved in burglary cases at 4 places each in sankeshwar and hukkeri belgavkar burglary



belgaum बेळगाव belgavkar burglary cases at 4 places each in sankeshwar and hukkeri arrested

बेळगाव : 8 ठिकाणी घरफोडी, सराईत चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
169 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 100 ग्रॅम चांदीच्या वस्तू जप्त केल्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm