athani-woman-died-after-being-run-over-by-a-four-wheeler-bathing-river-and-offering-pray-athani-tirtha-village-belgaum-car-accident-202303.jpg | बेळगाव : धक्कादायक...! देवाळासमोर लोटांगण घालताना कार अंगावर गेल्याने महिलेचा मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : धक्कादायक...!
देवाळासमोर लोटांगण घालताना कार अंगावर गेल्याने महिलेचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

पाडव्याच्या सणादिवशी कृष्णा नदीत अंघोळ करून देवास दंडवत घालताना....


बेळगाव-अथणी : अथणी तीर्थ गावात नदीतून आंघोळ करून देवास दंडवत (लोटांगण) घालत येताना चारचाकी अंगावर गेल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ऐश्वर्या नाईक (वय 24) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, ऐश्वर्या नाईक ही युवती पाडव्याच्या सणादिवशी कृष्णा नदीत अंघोळ करून गावातील देवास दंडवत घालताना रस्त्यावरून जाणाऱ्या कारचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. अथणी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.