husband-killed-his-wife-due-to-a-family-dispute-he-committed-suicide-by-drinking-poison-salapur-in-ramdurg-taluka-belgaum-बेळगाव-belgavkar-salapur-in-ramdurg-taluka-murder-husband-killed-his-wife-202303.jpg | बेळगाव : पत्नीचा खून केला आणि खुनानंतर त्याने स्वतः ही.... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : पत्नीचा खून केला आणि खुनानंतर त्याने स्वतः ही....

belgavkar.com | belgaum | belgavkar

किरकोळ कारणातून दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला अन्


बेळगाव : कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः ही विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना रामदुर्ग तालुक्यातील सालापूर येथे घडली. जानव्या बसवगौडा द्यामण्णवर (वय 50) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विषप्राशन केल्याने मृत पावलेल्या पतीचे नाव बसवगौडा शासपन्नवर द्यामण्णवर (वय 55) असे आहे. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद होत होता.
बुधवारी किरकोळ कारणातून दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. यावेळी पतीने धारदार शस्त्राने पत्नीवर वार करत तिचा खून झाला. ती मृत पावल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या बसवगौडाने स्वतः विषप्राशन करून जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच कटकोळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कटकोळ पोलिसांत नोंद झाली आहे.