rajesh-bhushan-and-modi.jpg | Coronavirus : देशातील फैलावलेला कोरोना ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट; आरोग्य विभागाची महत्वाची अपडेट | belgaum news | belgavkar बेळगावकर

Coronavirus : देशातील फैलावलेला कोरोना ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट;
आरोग्य विभागाची महत्वाची अपडेट

belgavkar.com | belgaum | belgavkar

8 राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले


नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या केसेसमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयामध्ये वारंवार बैठका होत आहेत. कालच पंतप्रधान मोदींनी देखील यासंदर्भात बैठक घेतली होती. दरम्यान, आज आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषद घेत देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत महत्वाची माहिती दिली. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, भारतात सध्या सर्व प्रसार झालेले कोरोना विषाणूचे प्रकार हे ओमिक्रॉनचे उपप्रकार आहेत. ज्या 8 राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत त्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणती कारवाई करण्याची आवश्यकतेबाबत मी 16 मार्च रोजी वैयक्तिकरित्या या राज्यांना पत्र लिहिले होतं. The eight states where maximum number of cases are being reported are - Maharashtra, Gujarat, Kerala, Karnataka, Tamil Nadu, Delhi, Himachal Pradesh and Rajasthan. I had personally written to these states on 16th March that what actions do they need to take up.

All currently circulating variants in India are sub-variants of Omicron: Union Health Secretary Rajesh Bhushan
दरम्यान, आत्तापर्यंत जगभरातील कोविडच्या एकूण प्रकरणांपैकी 1 टक्के प्रकरणं भारतात नोंदवली गेली आहेत. सध्या भारतातील अ‍ॅक्टिव्ह केसेस 7,600 वर आहेत. दररोज सरासरी 966 प्रकरणे नोंदवली जात आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दररोज सरासरी 108 प्रकरणे नोंदवली जात होती, ती आता 966 वर पोहोचली आहे, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.