dr-babasaheb-ambedkar-jagjivanram-birth-anniversary-will-be-celebrated-with-enthusiasm-belgaum-election-code-of-conduct-will-be-implemented-in-the-wake-of-the-assembly-elections-202303.jpg | बेळगाव : डॉ. आंबेडकर-जगजीवनराम यांची जयंती उत्साहात होणार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : डॉ. आंबेडकर-जगजीवनराम यांची जयंती उत्साहात होणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

जिल्हा पंचायत कार्यालयातील बैठकीत घेतला निर्णय


बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबू जगजीवनराम यांची जयंती करण्यात येणार आहे. मात्र, या दोन्ही जयंती मोठ्या उत्साहात केल्या जातील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा पंचायतीच्या सभागृहामध्ये ही बैठक घेण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी होणार आहे. याचबरोबर डॉ. बाबू जगजीवनराम यांची जयंती 5 एप्रिल रोजी होणार आहे. या दोन्ही महान पुरुषांच्या जयंती दरवर्षीप्रमाणे अत्यंत शिस्तबद्ध आणि मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या जयंतीला प्रारंभ करण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून मिरवणूक काढण्यात येणार असून कार्यक्रमासाठी मंडप तसेच इतर सर्व ती व्यवस्था करण्यात येणार आहे. सरकारी कार्यालये तसेच इतर चौकांमध्ये विद्युत रोषणाई करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. शाळा तसेच तालुक्यातील सर्व कार्यालयांमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. या जयंतीनिमित्त दहावी, पीयुसीमध्ये सर्वात अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
याचबरोबर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. बाबु जगजीवनराम यांची 116 वी जयंती 5 एप्रिल रोजी होणार असून त्या दिवशी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उदघाटन केले जाणार आहे. कित्तूर चन्नम्मा चौक, त्यानंतर संगेश्वरनगर येथे जाऊन या मिरवणुकीची सांगता होणार आहे. या मिरवणुकींमध्ये विविध कलापथके सहभागी होणार आहेत. या दोन्ही मिरवणुकीमध्ये आचारसंहितेबाबचे सर्व नियम पाळले जाणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय व्यक्तीचा बॅनर लावण्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. या बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोवर, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांताला, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यासह मल्लेश चौगुले, गुंडू तळवार, मल्लेश कुरंगी, दुर्गेश मेत्री, रवी बस्तवाडकर, महेश कोलकार यांच्यासह समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.