अजमेरच्या यात्रेतील धक्कादायक दुर्घटनेचा Video व्हायरल, 50 फुटांवरून पाळणा कोसळला अन्…

अजमेरच्या यात्रेतील धक्कादायक दुर्घटनेचा Video व्हायरल, 50 फुटांवरून पाळणा कोसळला अन्…

belgavkar.com | belgaum | belgavkar

Viral Video : लोकांनी भरलेला आकाशपाळणा उंचावर गेला अन् तितक्यात केबल तुटली;

अजमेरमधील यात्रेतील एका दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजमेरमध्ये सुरू असलेल्या यात्रेतील जवळपास 50 फूट उंचीवर असणारा पाळणा अचानक खाली कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेत 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर झोपाळ्यातील महिला आणि मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पाळणा खाली पडतानाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अजमेर येथील बसस्थानकाजवळ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत वर्टिकल जॉयराइड (उभा फिरणारा) पाळणादेखील लावण्यात आला होता. अनेक यात्रेकरु या झोपाळ्यात बसण्यासाठी गर्दी करत होते, त्यामुळे पाळण्याभोवती मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी सायंकाळी अनेक यात्रेकरु या पाळण्यात बसण्याचा आनंद घेत होते. याचवेळी झोपाळ्याची एक केबल अचानक तुटल्यामुळे झोपाळा थेट वरून खाली कोसळला आणि घटनास्थळी चेंगराचेंगरी सुरु झाली. शिवाय लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.


या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामधील दृश्य खूप विचलिक करणारी आहेत. व्हिडीओमध्ये पाळणा खाली कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. जे पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले, पाळणा कशामुळे खाली पडला याबाबतचा तपास ते करत आहेत.
झोपाळ्याचा ऑपरेटर फरार
अपघाताची माहिती मिळताच अजमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील सिहाग यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तर ही दुर्घटना घडताच पाळण्याचा ऑपरेटर घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ अनेक रुग्णवाहिका बोलवल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. ASP सिहाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही सिहाग यांनी सांगितलं.

ajmer pilgrimage video shocking accident in goes viral



caught on camera 11 injured after tower swing ride crashes at fair in rajasthans ajmer scary video

ajmer pilgrimage a video of shocking accident in goes viral cradle falls from 50 feet

अजमेरच्या यात्रेतील धक्कादायक दुर्घटनेचा Video व्हायरल, 50 फुटांवरून पाळणा कोसळला अन्…
Viral Video : लोकांनी भरलेला आकाशपाळणा उंचावर गेला अन् तितक्यात केबल तुटली;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm