mr-vikas-suryavanshi-of-belgaum-mahabala-shri-kitab-bodybuilding-belgaum-बेळगाव-belgavkar-bodybuilding-belgaum-mahabala-shri-kitab-202303.jpg | बेळगावच्या विकास सूर्यवंशीला 'मि. महाबला श्री' किताब #bodybuilding | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावच्या विकास सूर्यवंशीला 'मि. महाबला श्री' किताब #bodybuilding

belgavkar.com | belgaum | belgavkar

नित्यानंद कोटीयान पहिला उपविजेता, बेळगावचा उमेश गंगने उत्कृष्ट पोझर


बेळगाव : कारवार, कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना 'मि. महाबला श्री' राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या विकास सूर्यवंशीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर Mr. महाबला श्री हा मानाचा किताब मिळविला. तर उडपीच्या नित्यानंद कोटीयान याने पहिले उपविजेतेपद पटकाविले. तर बेळगावच्या उमेश गंगणेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. कारवार येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार आठ वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दीडशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढीलप्रमाणे, 55 किलो गट – 1) आकाश निंगराणी बेळगाव 2) महोम्मद आरीफ मंगळूर 3) महांतेश बागलकोट 4) हेमंत कुमार पी. माडिवाळ कारवार 5) शरद पुजारी कारवार.

60 किलो गट – 1) उमेश गंगने बेळगाव 2) रोनाल्ड डिसोझा मंगळूर 3) बबन पोटे बेळगाव 4) रोहण अल्लूर बेळगाव 5) नितीश गोरल बेळगाव.

65 किलो गट – 1) निधी मंगळूर 2) सोमशेखर कारवी उडपी 3) शंकऱ्याप्पा कुमचगी बागलकोट 4) मंजुनाथ सोनटक्की बेळगाव 5) प्रकाश किटाळी धारवाड.
70 किलो गट – 1) श्रवणन एच. बेंगळूर 2) राथील कुमार शिमोगा 3) साहेबलाल एम. विजापूर 4) विनीत हनमशेठ बेळगाव 5) दिक्षीत मंगळूर.

75 किलो गट – 1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव 2) संदीप उप्पार कारवार 3) फ्रांसेस नाईक कारवार 4) दयानंद निलजकर बेळगाव 5) नितीन सी. नाईक कारवार.

80 किलो गट – 1) शंकर हुन्नावर कारवार 2) गजानन काकतीकर बेळगाव 3) गौरेश गौडा कारवार 4) चेतन नाईक कारवार.

85 किलो गट – 1) नित्यानंद कोटीयान उडपी 2) कुमार एम. कारवार 3) काशिनाथ नायकर धारवाड 4) दिलीप एम. नाईक कारवार.

85 किलो वरील गट – 1) विकास सूर्यवंशी बेळगाव 2) राजेश माडीवाळ कारवार 3) राघवेंद्र नाईक कारवार यांनी विजेतेपद पटकाविले.
त्यानंतर मि. महाबला श्री किताबासाठी आकाश निंगराणी, उमेश गंगने, सोमशेखर कारवी, श्रवणन एच. प्रताप कालकुंद्रीकर, शंकर हावन्नावर, नित्यानंद कोटीयान व विकास सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये नित्यानंद कोटीयान, विकास सूर्यवंशी व शंकर हावन्नावर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये बेळगावच्या विकास सूर्यवंशीने आपल्य पिळदार शरीराच्या जोरावर मि. महाबला श्री हा मानाचा किताब पटकाविला. तर उडपीच्या नित्यानंद कोटीयानने पहिले उपविजेतेपद पटकाविले. बेळगावच्या उमेश गंगनेने उत्कृष्ट पोझींगद्वारे उत्कृष्ट पोझरचा मानाचा किताब पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विकास सूर्यवंशीला मानाचा किताब, आकर्षक चषक, 20000 रु. रोख, प्रमाणपत्र व भेटवस्तू तर पहिल्या उपविजेत्या नित्यानंद कोटीयानला 15000 रु. रोख, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट पोझर उमेश गंगनेला 5000 रु. रोख, मानाचा किताब, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी एम. गंगाधर, जे. डी. भट्ट, उमा महेश, अनंत लंगरकांडे, सुनील पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले.