बेळगाव : पिरनवाडी चेक पोस्टवर लाखो रुपये जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई


बेळगाव : पिरनवाडी येथील चेकपोस्टवर 2 लाख 89 हजार रु. जप्त केले. निवडणूक भरारी पथकाने बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली. पिरनवाडी चेक पोस्ट जवळून इंडिका कार जात होती. संशय आल्याने या कारचा तपास केला असता यामध्ये 2 लाख 89 हजार रुपयांची रोकड आढळून आली.
या रकमेबाबत संबंधितांना कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांनी कागदपत्रे दाखवण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम ताब्यात घेऊन जिल्हा खजिन्यात जमा केली.