बेळगाव : देवलत्ती येथे 20 लिटर गावठी दारूचा साठा सापडला

belgavkar.com | belgaum | belgavkar

निवडणुकीच्या काळात मतदारांना दारुचे वाटप केले जाते


बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पोलिसांची करडी नजर आहे. अशातच निवडणूक आचारसंहितेच्या आधीच पोलिसांकडून वाहनांची देखील कसून तपासणी करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असतानाच मोठ्याप्रमाणावर देशी आणि विदेशी दारुचा साठा जप्त केला करण्यात येत आहे. कामसिनकोप्पजवळील देवलत्ती (ता. खानापूर) येथे खानापूर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून 20 लिटर गावठी दारूचा साठा जप्त केला.
सार्वजनिक ठिकाणी गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सीपीआय रामचंद्र नाईक यांनी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रकाश राठोड व सहकाऱ्यांनी सापळा रचून घटनास्थळी छापा टाकला; मात्र पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला; मात्र 20 लिटर गावठी दारूचा साठा सापडला. निवडणुकीच्या काळात मतदारांना दारुचे वाटप केले जाते. उच्चभ्रू भागातही विदेशी दारुचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा प्रकारांमुळे निवडणुकीत व्यत्यय येऊ नये यासाठी कारवाई सुरु आहे.