chikkodi-nagral-illegal-liquor-was-being-sold-in-nagral-by-excise-inspectors-election-chikodi-nagral-village-belgaum-belgaum-बेळगाव-belgavkar-nagral-illegal-liquor-was-being-sold-in-nagral-by-excise-inspectors-election-202303.jpg | बेळगाव : नागराळ येथे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : नागराळ येथे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने कारवाईला गती दिली


बेळगाव-चिक्कोडी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने कारवाईला गती दिली आहे. त्यातून बेकायदेशीररित्या दारू विकताना एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 21 लिटर 600 मिली दारू जप्त केली आहे. वाहतुकीसाठी वापरलेली मोटार असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गजानन बाबू माने (रा. नागराळ) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी : नागराळ येथे बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिक्कोडी अबकारी निरीक्षकांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता नागराळ येथे धाड टाकून दारू जप्त केली. 90 मिलीच्या बॉक्समधील दारू खात्याने जप्त केली. या दारूच्या वाहतुकीसाठी आणलेली मोटारही जप्त केली.
अबकारी खात्याचे आयुक्त, साहाय्यक आयुक्त, उपआयुक्त चिक्कोडी यांच्या मार्गदर्शनाखाली चिक्कोडीच्या निरीक्षकांनी ही कारवाई केली. माने याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.