belgaum-बेळगाव-belgavkar-belgaum-two-arrested-for-selling-ganja-in-khanapur-two-arrested-for-selling-ganja-in-khanapur-belgaum-khanapur-खानापूर-बेळगाव-belgavkar-belgaum-202303.jpg | बेळगाव : खानापुरात दोघांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खानापुरात दोघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

रुमेवाडी गावच्या हद्दीतील गोवा क्रॉस जवळ ही कारवाई

बेळगाव-खानापूर : खानापूर शहर आणि परिसरात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना खानापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास रुमेवाडी गावच्या हद्दीतील गोवा क्रॉस जवळ ही कारवाई करण्यात आली. मनसुर आप्पालाल मकानदार (39, रा. पारिश्वाड ता. खानापूर आणि रामचंद्र नागाप्पा शिंदे (63, रा. लक्केबैल ता. खानापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक आणि उपनिरीक्षक प्रकाश राठोड यांना संबंधित दोघे अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह सकाळपासून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 किलो 105 ग्रॅम गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली स्कुटी जप्त करण्यात आली. त्यांच्यावर मादक पदार्थ विक्री प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.