बेळगाव : बाळंतिणीची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शिवमनगर, हिंडलगा येथील एका बाळंतिणीने राहत्या घरी झोपाळ्याच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. विजयलक्ष्मी जितेंद्र कांबळे (वय 30) असे त्या दुर्दैवी बाळंतिणीचे नाव आहे.
तिचे सासर मुंबई येथील असून प्रसूतीसाठी हिंडलगा येथील माहेरी आली होती. तीन महिन्यांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला आहे. बाळ-बाळंतीण सुखरूप होते. गुरुवारी सकाळी 6 ते 6.30 यावेळेत बाळासाठी बांधलेल्या झोपाळ्याच्या साडीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. विजयलक्ष्मीची आई प्रमिळा यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.