yatra-of-shri-khandoba-from-mangasuli-kagwad-belgaum-khandoba-belgaum-बेळगाव-belgavkar-khandoba-from-mangasuli-kagwad-belgaum-202303.jpg | बेळगाव : मंगसुळी येथील श्री खंडोबा देवाची यात्रा | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : मंगसुळी येथील श्री खंडोबा देवाची यात्रा

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव | उगार खुर्द (कागवाड) : कर्नाटक, महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या मंगसुळी येथील श्री खंडोबा देवाची यात्रा शुक्रवारी (ता. 31 मार्च) आहे. या दिवशी महानैवेद्य असून रात्री मंदिरात साखळी तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेस मंगळवारी (ता. 28) पासून प्रारंभ होणार आहे. यात्रा 4 एप्रिल अखेर साजरी होणार आहे. यात्रेचा 31 मार्च हा मुख्य दिवस आहे. या दिवशी दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, गोवा या भागातून लाखो भाविक दर्शनास येणार आहेत.
ग्रामपंचायत, देवस्थान मंडळ, पुजारी परिवार यात्रेच्या तयारीला लागला आहे. यात्रेकरूसाठी पिण्याचे पाणी, पथदीप, आरोग्य सुविधा केली जाणार आहे. यात्रेत बैल व घोड्याचा मोठा बाजार भरतो. खरेदी जास्त होते. बेळगाव, विजापूर, सांगली, चिकोडी भागातून यात्रेकरूसाठी खास बसेसची सोय केली जाणार आहे.