mysterious-sound-at-night-at-savgaon-belgaum-belgaum-sound-voice-savgaon-belgaum-mysterious-sound-night-night-sound-savgaon-belgaum-सावगाव-बेळगाव-202303.jpg | बेळगाव : सावगावातील रहस्यमय आवाज गायब झाला; रात्रीची गस्त वाढली अन्... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : सावगावातील रहस्यमय आवाज गायब झाला;
रात्रीची गस्त वाढली अन्...

belgavkar.com | belgaum | belgavkar

सावगावात रात्रीच्या वेळी गूढ आवाजाची दहशत आणि अफवा


बेळगाव : बेळगाव शहरापासून जवळच असलेल्या सावगाव (ता. बेळगाव) येथे रात्रीच्या वेळी गूढ आवाज येत असून, संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली आहे. सावगाव येथे रहस्यमय आवाज येत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी हा आवाज ग्रामस्थांना ऐकू येत आहे. त्या आवाजाचे रेकॉर्डिंगही करण्यात आले असून, सोशल मिडीयावरही हे रेकाॅर्डिंगही व्हायरल झाले आहे. आता ही अफवा आहे की आणखीन एक याबाबत चर्चा होत असताना मागील तीन दिवसांपासून आवाज गायब झाला आहे. परंतु गावकऱ्यांमध्ये असणारी धास्ती कायम आहे. ग्राम पंचायतींकडून गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठिकठिकाणी प्रखर प्रकाश देणाऱ्या दिव्यांची सोय केली आहे.
सध्या अनेक सामाजिक कार्यकर्ते गाव परिसरात तळ ठोकून आहेत. आवाजाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यानंतर गावात गस्त आणि युवकांची शोधमोहिम वाढताचं रहस्यमय आवाज गायब झाला आहे. परंतु गावकरी अद्याप भीतीच्या छायेखाली वावरत असून ग्रामपंचायतींकडून ठिकठिकाणी दिवे लावण्यात आले आहेत. सावगावातील काही ग्रामस्थ शेतातील घरांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनीही या आवाजाची धास्ती घेतली आहे. समाजमाध्यमांवर (Social Media) या प्रकाराची जोरदार चर्चा आहे, पण तो आवाज कोठून येतो, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा मनुष्य अथवा पक्षी ओरडत असल्याचा आवाज ऐकल्यानंतर कळतो, पण तो रात्रीच्या वेळीच का ओरडतो? भीती घालण्याच्या उद्देशाने हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात आहे का? काय आणखी कोणा खोडसाळ व्यक्तीकडून हे कृत्य केले जात आहे का? याचा शोध घेण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे गावातील महिला व लहान मुलांत धास्ती निर्माण झाली आहे. या प्रकाराचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे. रात्री उशिरा हा आवाज ऐकावयास येतो. ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर गावातील कुत्री जोरजोरात भुंकतात, त्यामुळे गावातील वातावरणच भीतीदायक बनल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात रात्रीच्यावेळी काही ठिकाणी विचित्र आवाज येत असल्याची चर्चा आहे. मात्र, अनेकांना प्रत्यक्षात याचा अनुभव आलेला नाही. ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये.