बेळगाव : मुलगा न झाल्याच्या नैराश्यातून नातेवाईकांच्या मुलाला खून, जन्मठेपेची शिक्षा सुनावली

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव-चिकोडी : मुलगा न झाल्याच्या नैराश्यातून नातेवाईकांच्या मुलाला बॅरेलमध्ये बुडवून खून केलेल्या आरोपी महिलेला चिकोडी सातवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथील जयश्री बाहुबली अलासे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे महिलेचे नाव आहे. 24-8-2018 रोजी शेडबाळ येथील कुरुबर गल्लीतील राजू तात्यासाहेब अलासे यांच्या अडिच वर्षीय कार्तिक या मुलाचा सदर महिलेने खून केला होता.
कार्तिकला घरी बोलावून बॅरेलमध्ये बुडवून खून केल्याप्रकरणी कागवाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी चिकोडी सातव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एस. एल. चव्हाण यांनी आरोपी जयश्री अलासे या महिलेला जन्मठेप व 5000 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.