karnataka-high-court-permits-government-conduct-board-exams-students-classes-5-8-classes-belgaum-202303.jpg | बेळगाव : पाचवी, आठवी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक; पाचवी-आठवी बोर्ड परीक्षा शाळेतच होणार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : पाचवी, आठवी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक;
पाचवी-आठवी बोर्ड परीक्षा शाळेतच होणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

27 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत ही परीक्षा होणार;
Board Exams For 5th And 8th Class

Board Exams For 5th And 8th Class Students Karnataka


बेळगाव : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पाचवी व आठवीच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत ही परीक्षा होणार असून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पहिली ते नववीच्या परीक्षा शनिवारी (दि. 18 मार्च) संपणार असून 27 मार्चपासून पाचवी व आठवीच्या बोर्ड परीक्षा होणार असल्याचे शिक्षण खात्याने गुरुवारी शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवले आहे. 30 मार्च रोजी गणित विषयाचा पेपर सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत होणार आहे. इतर विषयांचे पेपर दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत होणार आहेत. एकूण दोन तासांचा पेपर असून प्रत्येक पेपरसाठी 40 गुण असणार आहेत.
वेळापत्रक : 27 मार्च : प्रथम भाष (मराठी)
28 मार्च : इंग्रजी
29 मार्च : तृतीय भाषा कन्नड
30 मार्च : गणित
31 मार्च : विज्ञान
1 एप्रिल : समाज विज्ञान
पाचवी-आठवी मूल्यमापन परीक्षा घेण्याबाबत निर्णय झाल्यानंतर शिक्षण खात्याने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 27 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा बोर्ड पातळीवर घेण्याबाबत राज्यात बरेच दिवस त्यावर चर्चा सुरू होती. याबाबत न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने त्याला आक्षेप घेतल्याने या बोर्ड परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होताना काही नियमावली पाळून परीक्षा घेण्यास परवानगी दिली. त्यात प्रामुख्याने कुठल्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करता येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देताना नापास होणार नसल्याचा दिलासा मिळाला आहे. पाचवी-आठवी परीक्षा बोर्ड पातळीवर होणार आहे. 27 पासून घेण्यासाठी नियोजन केले आहे. त्या-त्या शाळेत या परीक्षा होतील.