महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दुग्धाभिषेक केला जाणार आहे. या दिवशी इतर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याशिवाय गडावर भगवा ध्वज फडकवण्यास पोलिस अधिकारी मज्जाव करत आहेत. भगवा ध्वज फडकावणे कोणताही गुन्हा नाही. त्यामुळे अशा पोलिसांना तंबी द्यावी, अशी विनंती त्यांच्याकडे करण्यात आली. पोलिस आयुक्तांनी याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तहसीलदार, पुरातत्व खाते आणि बेळगाव ग्रामीणच्या पोलिस अधिकाऱ्यांनाही माहितीचे निवेदन देण्यात आले. विकास कलघटगी, बाळू जोशी, गौरव जोशी, नवीन हंचिनमनी, प्रीतम पाटील, शाम गौंडाडकर आदी उपस्थित होते.