congress-list-of-candidates-before-announcing-the-date-of-upcoming-assembly-elections-assembly-elections-karnataka-congress-list-belgaum-बेळगाव-belgavkar-belgaum-202303.jpg | बेळगाव : लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, सेट बंधू, सतीश जारकीहोळी, काकासाहेब संभाव्य यादीत; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, सेट बंधू, सतीश जारकीहोळी, काकासाहेब संभाव्य यादीत;

belgavkar.com | belgaum | belgavkar

काँग्रेसची पहिली संभाव्य उमेदवारांची यादी तयार;
पहिली 135 संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित

बेळगाव – कर्नाटक : आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. विद्यमान 4 आमदारांना वगळण्यात येणार असून, पहिली 135 संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. काही मतदारसंघातील उमेदवार निवडीमध्ये संभ्रमावस्था असल्याने त्या ठिकाणी दोन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. अंतिम निवडीसाठी पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार आहे. दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बेळगाव जिल्ह्यातील सगळ्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. त्याबरोबरच गेल्या वेळी पराभूत झालेल्याही काही जणांना उमेदवारी मिळणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार असे
बेळगाव ग्रामीण – लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूर – अंजली निंबाळकर, बेळगाव दक्षिण – सतीश जारकीहोळी / अन्य, बेळगाव उत्तर – फिरोज सेठ / असिफ सेठ, निपाणी – काकासाहेब पाटील, हुक्केरी – ए.बी पाटील, गोकाक अशोक पुजारी, यमकनमर्डी – सतीश जारकीहोळी / प्रियंका जारकीहोळी, सौंदत्ती – सतीश जारकीहोळी / अन्य, कुडची – शाम घाटगे किंवा महेंद्र तमण्णा, कागवाड राजू कागे किंवा दिग्वीजय देसाई, अथणी – गजानन मंगसुळी किंवा शशिकांत पुजारी अशी पहिली यादी तयार करण्यात आली आहे. संभाव्य उमेदवारांची निवड करताना जिंकण्याची शक्यता, सामाजिक न्याय या मुख्य मापदंडासह, पक्षाशी निष्ठा यालाही प्राधान्य देण्यात आले आहे.
इतर मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार
कनकपुर – डी के शिवकुमार, बीटीएम लेआउट – रामलिंग, जयनगर – सौम्या रेड्डी, बॅटरायनपुर – कृष्ण बैरगौडा, हेब्बाळ – भारती सुरेश, गांधीनगर – दिनेश गुंडुराव, कोटगेरे – डॉ. जी परमेश्वर, चित्तापूर – प्रियांक खर्गे, कंपली – गणेश, बळ्ळारी ग्रामीण – नागेंद्र, संडूर – ई तुकाराम, भद्रावती – बी के संगमेश, दावणगिरी दक्षिण – श्यामनूर शिवशंकराप्पा, बबलेश्वर – एम. बी पाटील, बसवनबागेवाडी – शिवानंद पाटील, कोप्पळ – राघवेंद्र हिटनाळ, हुबळी धारवाड पूर्व – प्रसाद अब्बय्या, कलघटगी – संतोष लाड, होविनहडलगी – पी टी परमेश्वर नायक, हगरीबोमनहळळी – भीमा नायक, वसकोटे – शरत बच्चेगौड, वरुणा – यतींद्र सिद्धरामय्या, हुनसुरू – एच पी मंजुनाथ, पिया – पट्टण व्यंकटेश, चामराजनगर – सी पुट्टरंगशेट्टी, हेग्गडदेवनकोटे – अनिल चिक्कमादू, सर्वज नगर – के.जे जॉर्ज,
चामराजपेटे – जमिर अहमद, शिवाजी नगर – रिजान अर्षद, विजयनगर – एम के कृष्णप्प, केजीएफ – रुप शशिधर, बंगारपेठ – नारायणस्वामी, मालूर – नंजेगौड, रायचूर ग्रामीण – बसनगौड दद्दल, दावनेगेरे उत्तर – एस एस मल्लिागाजुन, हरिहर – एस रामप्पा, हासदुर्ग – गोविंदप्प, चक्कळकेरे – टी.रघुमूर्ती, शिरा – टी.बी.जयचंद्र, मधुगिरी – के,एन राजन्न, रानेबेन्नूर – के.बी.कोळीवाड, हरियुरु – सुधाकर, के आर नगर – टी रविशंकर, हनुरु – नरेंद्र, चिक्कनायकनहळ्ळी – किरण कुमार, मदुरु – उदय कुमारगौड, नागमंलम – चलुवरायस्वामी, मळवळ्ळी – नरेंद्रस्वामी, गुंडलूपेठे – गणेश प्रसाद, रामदुर्ग – अशोक पट्टण,बसवणगुडी – यु बी व्येंकटेश, राजाजीनगर – पुट्टण, सोबर – मधु बंगराप्पा, चित्रदुगै – रविंद्र पप्पी, हिरेकेरुर – यु बी बनकार, विराज पेठ – पुन्नना, मागडी – बालकृष्ण, चिंतामणी – एम सी सुधाकर, हुनगुंद – विजयानंद काशप्पनावर, मुद्देबिहाळ – सी,एस नाडगौड, रायचुर – एन एस बोसराज, कनकगिरी – शिवराज तंगडगी, यलबुर्गा – बसवराज रायरेड्डी, कारवार – सतीश सैल, भटकळ – मंकाळ वैद्य, हानगल – श्रीनिवास माने, बैंदूरु – गोपाल पुजारी, कापू – विनय कुमार सोरके, कडूर – वायएसव्ही दत्ता, यांची नावे निश्चीत करण्यात आली आहेत. राहूल गांधी यांना कळवून यादी जाहीर करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
काही मतदार संघासाठी दोन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. अंतिम निवड पुन्हा बैठक घेऊन करण्यात येईल. होळेल्लेकर मतदार संघ सविता रघू, एच अंजनेय, तिर्थहळळी – किम्मन रत्नाकर,मुजूनाथ गौड,बळ्ळारी शहर – अल्म प्रशांत, अनिल लाड, शिगांवी – अजंपीर खाद्री, सोमन्न बेवीनमरद, गंगावती – इक्बाल अन्सारी, एच आर श्रीनाथ, गुलबर्गा ग्रामीण – रेवूनायक बेळमगी, विजयकुमार, तेरदाळ – उमाश्री, मल्लेशप्प, बागलकोट – एच वाय मेटी, देवराज पाटील, नंजनगुड – दर्शन धैवनारायण, बोस महादेवप्पा, चामुंडंश्वरी – मरिगौड, चंद्रशेखर, मंगळूर दक्षिण – आयवान डीसोजा, जे आर लोबो, बेळतंगडी – रक्षित, शिवराम, बंगळूर दक्षिण – आर.के.रमेश, सुष्मा राजगोपाल, दासरहळ्ळी – कृष्णमुर्ती, नागलक्ष्मी चौदरी, कलघटगी – संतोष लाड, नागरज चब्बी यांची नावे यादीमध्ये आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्ती असणारे डॉ. एच. सी. महादेवप्पा आणि रामनगर येथील खासदार डी. के. सुरेश यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.