बेळगाव : उचगावात भव्य कुस्ती आखाडा

belgavkar.com | belgaum | belgavkar

उचगाव येथील हनुमान कुस्तीगीर संघातर्फे भव्य कुस्ती आखाडा

बेळगाव : उचगाव येथील हनुमान कुस्तीगीर संघातर्फे रविवार 19 मार्च रोजी दुपारी 3 वाजता भव्य कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे.
IMG-20230317-WA0025-compress19
हा कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी उचगावमधील अनेक माजी पैलवान तसेच युवक, ग्रामस्थ, कुस्ती शौकीन सर्वजण कामाला लागले असून आखाड्याची पाहणी, दुरुस्ती करून भव्य असा आखाडा तयार करण्यामध्ये सर्व कार्यकर्ते गुंतले आहेत. उचगावच्या पूर्व दिशेला असलेल्या मरगाईदेवीच्या परीसरातील भव्य अशा तलावामध्ये हा कुस्ती आखाडा आयोजित केला आहे. सदर तलाव प्रचंड मोठा असल्याने कुस्ती शौकीनाना कुठेही बसून या कुस्तीचा आनंद लुटता येतो. याचबरोबरच लहान-मोठ्या अशा एकूण जवळपास 50 कुस्त्या या आखाड्यात होणार आहेत. या कुस्ती मैदान उदघाटन समारंभाला सर्व थरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत