telangana-six-persons-killed-in-massive-fire-at-secunderabad-shopping-complex-telangana-swapnalok-complex-fire-6-killed-six-killed-in-major-fire-in-hyderabad-multi-storey-202303.jpeg | कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

सर्व 20 ते 24 वयोगटातील;
कॉल सेंटरमध्ये काम करत होते

तेलंगणातील सिकंदराबाद येथील स्वप्नलोक कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत 4 मुलींसह 6 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृतांचे वय 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान आहे. हे सर्वजण पाचव्या मजल्यावरील कॉल सेंटरचे कर्मचारी होते. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांची नावे : त्रिवेणी, श्रावणी, वेन्नेला, प्रमिला, शिवा आणि प्रशांत आहेत. हे सर्व कॉल सेंटरमध्ये काम करत होते. यातील प्रशांतचा अपोलो रुग्णालयात, तर इतर पाच जणांचा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला.
आग आठव्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावर पोहोचली : बचाव पथकाने 12 जणांना संकुलातून सुखरूप बाहेर काढले. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 6 जण बेशुद्ध झाले होते, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अतिरिक्त डीसीपी सय्यद रफिक यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हे कॉम्प्लेक्स आठ मजली होते. आठव्या मजल्यावरून सुरू झालेली आग पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. मात्र, पावसामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाची मोठी मदत झाली.