bengaluru-couple-selling-samosas-bengaluru-samosa-couple-claims-to-earn-in-lakhs-per-day-what-is-frying-bengaluru-couple-earns-rs-12-lakh-per-day-by-selling-samosas-202303.jpeg | 30 लाखांचं पॅकेज सोडून ‘हे’ जोडपं कर्नाटकात विकतंय समोसे, रोजची कमाई ऐकून व्हाल थक्क...! | belgaum news | belgavkar बेळगावकर

30 लाखांचं पॅकेज सोडून ‘हे’ जोडपं कर्नाटकात विकतंय समोसे, रोजची कमाई ऐकून व्हाल थक्क...!

belgavkar.com | belgaum | belgavkar

तब्बल 12 लाख दररोज कमवत आहेत. विश्वास बसत नसेल तर...

भारतात नवव्या शतकापासून समोसा आवडीनं खाल्ला जातो. समोश्याबद्दलची आवड आजही तितकीच तीव्र आहे. भारतात लहनांपासून मोठ्यांपर्यंत समोश्याची क्रेझ आहे. समोसा हा भारतातील लोकप्रिय नाश्ता आहे, खेड्यापासून शहरापर्यंत, श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडतो त्याचबरोबर खिशालाही परवडतो. हाच समोसा पोटाबरोबर तुमचा खिसाही भरतो, आता तुम्ही विचाराल खिसा कसा भरतो. तुम्ही जर एखाद्या स्टार्टअपच्या विचारात असाल तर समोसे विकून करोडपती होऊ शकता. हो कर्नाटकाच्या बेंगळुरूमधील एक जोडपं समोसे विकुन तब्बल 12 लाख दररोज कमवत आहेत. विश्वास बसत नसेल तर निधी आणि शिखर वीरची ही संघर्षमय कहाणी वाचा.
समोसा सिंहची सुरुवात : समोसे विकून या पती-पत्नीने करोडो रुपये कमावले आहेत. समोसे विकून हे दाम्पत्य दररोज 12 लाख रुपये कमावत आहे, त्याप्रमाणे दर महिन्याला हे जोडपे 30,000 हून अधिक समोसे विकत आहेत. दरम्यान त्यांची सुरुवात ही अतिशय संघर्षातून झाली आहे, त्यांनी 2015 ला बेंगळुरूमध्ये समोसा सिंग नावाचा फूड स्टार्टअप उघडण्यासाठी आपली 30 लाखांचं तगडं पॅकेजवाली नोकरी सोडली. दोघेही कॉर्पोरेट नोकरीत असताना अचानक शिखरच्या मनात स्वत:चं असं स्टार्टअप सुरु करण्याची आयडीया आली. सुरुवातीला निधीनं विरोध केला मात्र नंतर तिही त्याच्यासोबत काम करु लागली.
सुरुवातीला त्यांनी एका छोट्या दुकानातून समोसे आणि स्नॅक विकायला सुरुवात केली. व्यवसाय वाढू लागल्यावर त्यांना मोठ्या स्वयंपाकघराची गरज भासू लागली. किचनसाठी मोठी जागा हवी होती. मात्र दुसरीकडे, पैसेही शिल्लक नव्हते. त्यावेळी दोघांनीही आपला फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला. त्यामधून आलेले पैसे त्यांनी आपल्या व्यवसायात वापरले.
दररोज 12 लाखांचं उत्पन्न
समोसा सिंहची सुरु करताना या दोघांसमोर अनेक खडतर आव्हाने आली. मात्र, अखेर दोघांची मेहनत फळास गेली. काही दिवस आणि महिन्यांतच त्यांचा व्यवसाय वेगाने वाढला. आज ते दर दिवसाला सुमारे 30,000 समोसे विकतात. त्यांची उलाढाल 45 कोटी आहे. पती-पत्नी दोघे मिळून दररोज 12 लाख रुपये कमावत आहेत.