यावेळी आमदार अनिल बेनके यांनी अर्थसंकल्पावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनीही मराठी अर्थसंकल्पाचा मुद्दा टाळून मनोगत व्यक्त केले. पण, त्यानंतरही नगरसेवक साळुंखे आणि मंडोळकर यांनी मराठी भाषेतून अर्थसंकल्पाचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे सभागृहात काही काळ वाद निर्माण झाला होता. पण, महापौर शोभा सोमनाचे यांनी अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर मराठी आणि इंग्रजीमधून देऊ, असे सांगून विषय संपवला. त्यावर नगरसेवकांना शपथ देताना मराठी, कन्नड आणि इंग्रजीची मुभा देण्यात येते आणि आता मात्र मराठीवर अन्याय का करण्यात येतोय, असा सवाल साळुंखे यांनी उपस्थित केला.