भारतामध्ये 24 तासांत वाढले 56,282 नवे कोविड 19 रूग्ण - 2 करोड कोरोना सॅम्पल्सची तपासणी

भारतामध्ये 24 तासांत वाढले 56,282 नवे कोविड 19 रूग्ण - 2 करोड कोरोना सॅम्पल्सची तपासणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोविड हॉस्पिटलला आग;
8 जणांचा मृत्यू

भारतामध्ये आज (5 ऑगस्ट) कोरोनाग्रस्तांचा आकडा 19,64,537 पर्यंत पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशात 56,282 नवे रूग्ण, 904 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भारतामध्ये 5,95,501 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. तर कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांचा आकडा 13,28,337 इतका आहे. आतापर्यंत देशामध्ये कोरोना व्हायरसने 40,699 जणांचा बळी घेतला आहे. दिवसागणिक जशी कोरोनारूग्णांची संख्या 50 हजारांच्या वर आहे तशीच कोरोनामधून ठीक होऊन घरी परतणार्‍यांचा आकडादेखील मोठा आहे. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये आत्तापर्यंत कोविड 19 साठी 2,21,49,351 सॅम्पल्स तपासण्यात आले आहेत. तर काल 6,64,949 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
गुजरात मधील अहमदाबाद मध्ये आज सकाळी श्रेय हॉस्पिटलला आग लागल्याने त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान श्रेय हॉस्पिटल हे कोविडसाठी विशेष हॉस्पिटल होते. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमधील इतर रूग्ण इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

श्रेय हॉस्पिटलला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तात्कळ मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अन्य अधिकार्‍यांशी बोलून घटनेची माहिती घेतली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल हळहळ व्यक्त करत जखमींच्या आणि अन्य रूग्णांच्या प्रकृतीमध्ये तात्काळ सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
श्रेय हॉस्पिटलला लागलेल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान या हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात आग लागली होती. तेथे मृत्यूमुखी पडलेले रूग्ण हे कोविड पॉझिटिव्ह होते. दरम्यान 40 रूग्णांना इतरत्र सुरक्षित हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अहमदाबाद येथील श्रेय हॉस्पिटल मध्ये आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. Prime Minister's National Relief Fund मधून ही मदत दिली जाणार आहे.
 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भारतामध्ये 24 तासांत वाढले 56,282 नवे कोविड 19 रूग्ण - 2 करोड कोरोना सॅम्पल्सची तपासणी
कोविड हॉस्पिटलला आग; 8 जणांचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm