belgaum-baswan-galli-heavy-rain-202008.jpg | बेळगावच्या बसवाण गल्लीत भिंत कोसळून कारचे नुकसान VIDEO | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावच्या बसवाण गल्लीत भिंत कोसळून कारचे नुकसान VIDEO

belgavkar.com | belgaum | belgavkar

मलप्रभा नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे - काॅग्रेस रोड, नानावडी, कपिलेश्वर काॅलनी, टिळकवाडी, मराठा काॅलनीत पाणीच पाणी

गेल्या 48 तासांपासून सातत्याने झालेल्या पावसामुळे बेळगावात जागोजागी पाणी साचले आहे. यामुळे बेळगावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव शहरासह उपनगरांमध्येही पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यातही पावसाचा जोर वाढलाय. शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साठल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय. येत्या 24 तासात बेळगावमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मलप्रभा नदी - स्वयंभू मारूती हब्बनहट्टी देवस्थान जांबोटी खानापूर बेळगाव


मराठा काॅलनी टिळकवाडी
बसवाण गल्ली


शहरातील बसवाण गल्लीत घराची भिंत कोसळून कारचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची तसेच झाडांची पडझड होत आहे. बसवाण गल्लीतील घराची भिंत कोसळल्याने तिथे उभ्या असलेल्या महावीर कोठारी यांच्या रेनॉल्ड ट्वीड कारचे मोठे नुकसान झाले आहे.
काॅग्रेस रोड - नानावडी