LPG Price Hike : होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा चटका...;
घरगुती सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडर महागला;

belgavkar.com | belgaum | belgavkar

होळीला महागाईची झळ...!
;
घरगुती LPG सिलेंडर 50 रुपयांनी, तर कमर्शियल सिलेंडर 350 रुपयांनी महागला

मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.   माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. 
आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे. तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत.
4 महानगरांतील घरगुती सिलेंडर्सचे दर काय? 
दिल्लीत एलपीजीच्या किमती 1053 रुपयांवरुन 1103 रुपयांवर पोहोचल्यात. मुंबईत एलपीजीची किंमत 1052.50 रुपयांवरुन 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 1079 रुपयांवरुन 1129 रुपयांपर्यंत वाढली आहे. चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1068.50 रुपयांवरुन 118.50 रुपयांपर्यंत वाढली आहे.
देशातील मोठ्या शहरांत कमर्शियल सिलेंडर्सचे दर काय?
  महानगरं जुने दर सध्याचे दर  दिल्ली 1769 रुपये 2119.5 रुपये; मुंबई 1721 रुपये 2071.5 रुपये; कोलकाता 1870 रुपये 2221.5  रुपये; चेन्नई  1917 रुपये 2268 रुपये

8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ 
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. 
एलपीजीचे दर कसे ठरवले जातात?  : देशातील एलपीजी गॅसची किंमत ही इम्पोर्ट पॅरिटी प्राइसने ठरवली जाते. याला IPP असे म्हणतात. भारत बहुतांशी गॅसचा पुरवठा आयातीद्वारे पूर्ण केला जातो. त्यामुळे IPP देखील आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीद्वारे निश्चित होतो. सौदी अरेबियाच्या 'अरमाको' कंपनीच्या एलपीजी गॅस किंमतीच्या आधारे भारतातील गॅस दर निश्चित होतात. एलपीजीच्या किंमतीमध्ये गॅसचा दर, कस्टम ड्युटी, वाहतूक खर्च, विमा आदी घटकांचा समावेश आहे.  याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमतीचा परिणाम देशातील गॅस दरांवरही होतो. मात्र, त्याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरणदेखील गॅसच्या दरांवर परिणाम करते. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये व्यवहार केला जातो. डॉलरच्या तुलनेत होत असलेल्या घसरणीमुळे भारताला अधिक किंमत मोजावी लागत आहे.