जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनात पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी भरण्यासाठी जाता तेव्हा गर्दीमुळे तुमचा वेळ वाया जात असेल. त्यामुळे तुमची अनेक कामे उशिराने होत असतील किंवा राहून जात असतील. मात्र, आता तुमचा हा वेळ वाचू शकतो. नोएडातील तीन मित्र वैभव, आलाप आणि आर्यन यांनी एक अॅप तयार केले आहे जे तुमच्या या समस्येला नक्कीच दूर करेल. आता या तिन्ही मित्रांनी शार्क टँक इंडियाकडून निधीही मिळाला आहे. वैभवने 2020 मध्ये त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये आलाप, आर्यन या दोन मित्रांसोबत नवगती कंपनी सुरू केली. नवगती अॅप भारतात कुठेही तुमच्या जवळच्या इंधन स्टेशनवरील गर्दी, कर्मचारी, सुविधा इत्यादींची माहिती देते. वैभव सांगतात की, मी BITS पिलानी मध्ये शिकायचो, कॉलेजच्या कामामुळेच मी ऑटोने प्रवास करायचो. मात्र, ऑटोवाले मोठ्या समस्या सांगायचे की इंधन टाकताना खूप वेळ लागतो. ज्यामुळे याबाबतची माहिती मिळाली असती, ती गोष्ट आम्ही नक्कीच केली असती, असेही ते सागायचे. तेव्हाच माझ्या मनात हे आलं, त्यानंतर आम्ही तिघांनी कॉलेजमधून 7 लाख रुपयांचा निधी घेतला आणि नवगती सुरू केली, असे वैभव सांगतात.