11-year-old-girl-earns-1-crore-rupees-in-1-month-going-to-retire-20230227.jpeg | काय सांगता? दर महिन्याला 1 कोटी रुपये कमवते 'ही' 11 वर्षीय मुलगी; | belgaum news | belgavkar बेळगावकर

काय सांगता?
दर महिन्याला 1 कोटी रुपये कमवते 'ही' 11 वर्षीय मुलगी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

आता होणार 'रिटायर'

कमी वयात प्रसिद्धी मिळवणारे लोक खूप कमी असतात. अशीच एक मुलगी जी अवघ्या 11 वर्षांची आहे आणि एका महिन्यात 1 कोटींहून अधिक पैसे कमावते आहे. पण, आता ही मुलगी लवकरच निवृत्त होणार आहे. त्यानंतर ती तिच्या शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकेल. एका महिन्यात मोठी कमाई करणाऱ्या 11 वर्षीय पिक्सी कर्टिसकडे मर्सिडीज कारही आहे. Pixie Pixie's Pix नावाची कंपनी चालवते. ही एक ऑनलाइन कंपनी आहे.  पिक्सीची कंपनी विविध प्रकारचे हेअर बो, हेडबँड विकते.
पिक्सीची कंपनी आणि व्यवसाय तिची आई रॉक्सी जेसेन्को यांनी सुरू केला होता. रॉक्सी स्वतः देखील एक बिझनेस वुमन आहेत. Roxy ने news.com.au ला सांगितले-पिक्सी आता हायस्कूलवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. यामुळे ती हे काम करणार नाही. आम्हीही गेल्या अनेक महिन्यांपासून याचा विचार करत होतो.  पिक्सीने सुमारे तीन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला. पण आता तिचं लक्ष हायस्कूलवर आहे. जेव्हा आई रॉक्सीने तिला तिच्या 10 व्या वाढदिवशी 2.25 कोटी रुपयांची मर्सिडीज कार भेट दिली तेव्हा पिक्सी प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर पिक्सीच्या 11 व्या वाढदिवसाची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली. या वाढदिवसावर 30 लाखांहून अधिक रुपये खर्च करण्यात आले.
पिक्सी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर 1 लाख 21 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या साइटवर ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय ती तिच्या व्यवसायाशी संबंधित गोष्टीही शेअर करते.