ias-avasthi-shrinivas-shared-her-experience-know-her-upsc-success-story-20230227.jpeg | UPSC चा निकाल येताच जमिनीवर टेकले गुडघे, 2 दिवस वाजत राहिला फोन.....; IAS तरुणीने सांगितला अनुभव | belgaum news | belgavkar बेळगावकर

UPSC चा निकाल येताच जमिनीवर टेकले गुडघे, 2 दिवस वाजत राहिला फोन.....;
IAS तरुणीने सांगितला अनुभव

belgavkar.com | belgaum | belgavkar

तिसर्‍या प्रयत्नात प्रिलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू उत्तीर्ण

UPSC च्या अनेक सर्व्हिसेसपैकी एक असलेल्या IAS पदापर्यंत पोहोचणे सर्वात कठीण आहे. त्यासाठी लाखो उमेदवारांशी स्पर्धा तर असतेच, पण त्या स्पर्धा परीक्षेसाठी स्वत:ला तयार करणेही सोपे नसते. पण एका तरुणीने यूपीएससी परीक्षेचं मैदान मारत आयएएस पदाला गवसणी घातली आहे. अस्वथी श्रीनिवास असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. जाणून घेऊयात अस्वथी श्रीनिवास यांची यशस्वी आणि प्रेरणादायी कहाणी.

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, कर्नाटकच्या मंड्या येथील उपायुक्त IAS अस्वथी श्रीनिवास यांची काय अवस्था झाली होती, हे त्यांनी एका मुलाखतीत शेअर केले. यूपीएससी परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. अस्वथी श्रीनिवास यांनी त्यांचे शालेय शिक्षण केरळच्या केंद्रीय विद्यालयातून केले आहे. त्यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. या काळात नातेवाईक आणि इतर ओळखीच्या लोकांच्या टोमणे मारून स्वतःला खंबीर ठेवणे हे आव्हानापेक्षा कमी नव्हते.
निकाल जाहीर झाल्यावर काय केले?
आयएएस अस्वथी श्रीनिवास यांनी 2019 मधील दिवसाची घटना त्यांच्या एका मुलाखतीत शेअर केली आहे. जेव्हा UPSC CSE परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता त्यात अस्वथी यांनी 40 वा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी यूपीएससीचा निकाल जाहीर होताच त्यांनी देवाचे आभार मानण्यासाठी जमिनीवर गुडघे टेकले. यानंतर पुढचे 2 दिवस त्यांच्या मोबाईल आणि लँडलाईन फोनवर अभिनंदनाचे कॉल येत राहिले. अस्वथी श्रीनिवास या अजूनही त्यांचे संघर्षाचे दिवस आठवतात. त्या म्हणतात की, यूपीएससी परीक्षेत नापास झाल्यावर दुसऱ्या प्रयत्नासाठी वर्षभर वाट पाहावी लागते. यादरम्यान कोणी लग्नासाठी दबाव आणला तर अनेकजण करिअरचा पर्याय बदलण्याचा सल्ला देतात. अस्वथी यांच्या 3 वर्षांच्या अथक परिश्रमात त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांची त्या ऋणी आहेत, असे त्या सांगतात.
दुसरा प्रयत्न सर्वात निराशाजनक
आयएएस अस्वथी श्रीनिवास यांनी यूपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम्स पास केली होती. पण मुख्य परीक्षेत त्या नापास झाल्या. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यांना प्रिलिम्सही पास करता आली नाही. शेवटी, 2019 च्या तिसर्‍या प्रयत्नात त्यांनी प्रिलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू उत्तीर्ण करून 40 व्या रँकसह IAS अधिकारीपदाला गवसणी घातली. त्यांचा हा प्रवास तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.