रविवार दि. 19 रोजी संपूर्ण देशभर शिवजयंती साजरी होते. कर्नाटक सरकारने शिवजयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु प्रत्येक शाळा व महाविद्यालयात शिवजयंती साजरी व्हावी, यासाठी युवा समितीने शुक्रवारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सुजाता बाळेकुंद्री यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समितीचे नेते शुभम शेळके, सूरज कुडूचकर, सचिन केळवेकर, किरण मोदगेकर, वासू सामजी, आनंद पाटील, विनायक कावळे, प्रवीण रेडेकर, मनोहर संताजी यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.