आता बापालाच नाही तर नवरदेवालाही रडवणार सोनं...!
कितीने वाढले दर

belgavkar.com | belgaum | belgavkar

लग्नसराईत मोठा धक्का...!
EMI आणि लोन महाग, आता सोनंही अवाक्याबाहेर

नुकतेच RBI ने रेपो रेट जाहीर केले आहेत. त्यामुळे EMI आणि लोन महाग झाले आहेत. आता त्यासोबतच सोनं चांदीचे दर देखील महाग झाले आहेत. सोन्याचे दर तर आवाक्याबाहेर जात आहेत. आज सोन्याच्या दरांनी आणखी एक रेकॉर्ड केला आहे. GST सोडून 24 कॅरेट शुद्धतेच्या (999) सोन्याचे दर हे 50 रुपयांनी वाढून 57800 वर पोहोचले आहेत. आज एक किलो चांदीचा दर 69000 रूपयांवर आला आहे
दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आता सोनं खरेदी करणं आवाक्याबाहेर होत चाललं आहे. बजेटमध्ये सोनं, चांदी, प्लॅटिनम आणि हिरे यांच्यावरील आयात कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे यांच्या किंमती कमी होणार नाही हे निश्चित झालं आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर सतत बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याचे दर तपासूनच खरेदीला जा, आज उद्या करत राहिलात तर तुमचं नुकसान होऊ शकतं.