icc-world-test-championship-2023-final-7-11-june-at-the-oval-confirmed-ind-vs-aus-cricket-20230227.jpeg | ICC WTC Final : फायनलची तारीख ठरली | belgaum news | belgavkar बेळगावकर

ICC WTC Final : फायनलची तारीख ठरली

belgavkar.com | belgaum | belgavkar

'या' दिवशी रंगणार कसोटीचा महाकुंभ

ICC World Test Championship 2023 Final : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. WTC फायनल इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर 7 ते 11 जून 2023 दरम्यान खेळली जाणार आहे. 12 जून हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. या मैदानावर 100 हून अधिक कसोटी सामने खेळले गेले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत 24 कसोटी मालिकेतील 61 कसोटी सामन्यांनंतर कसोटी चॅम्पियनशिप गदासाठी हा अंतिम सामना खेळला जाणार आहे. न्यूझीलंडने 2021 मध्ये साउथेम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून कसोटी गदा जिंकली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया आणि भारत आघाडीवर आहेत. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर असून त्यानंतर भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर अंतिम फेरीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते. याशिवाय श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम शर्यतीत कायम आहे. दोन्ही संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, तर श्रीलंका दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडला जाणार आहे.