bjp-leader-ct-ravi-targets-siddaramaiah-said-hindutva-and-sanatan-dharma-is-not-different-20230222.jpeg | 'त्यांनी' मोठं षडयंत्र रचून पराभव केला; भाजपचा माजी मुख्यमंत्र्यांवर पलटवार @कर्नाटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

'त्यांनी' मोठं षडयंत्र रचून पराभव केला;
भाजपचा माजी मुख्यमंत्र्यांवर पलटवार @कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

मला नेहमीच भाजपनं हिंदुत्वविरोधी दाखवलं

कर्नाटक : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर हिंदूत्वावरुन जोरदार प्रहार केलाय. सनातन धर्म आणि हिंदुत्व वेगळं नाहीये. हिंदू धर्म समानतेवर विश्वास ठेवतो, असं रवींनी म्हटलंय. सी. टी. रवी यांनी ठामपणे सांगितलं की, सिद्धरामय्या हे हिंदुत्वाशी सहमत नसतील, तर याचा अर्थ त्यांना समानता नकोये. सिद्धरामय्यांना जातीवाद हवा आहे, म्हणून त्यांनी षडयंत्र रचून परमेश्वराचा पराभव केला. ते हिंदुत्वाशी सहमत नाहीत, हे त्यांचं चरित्र दाखवतं, असंही ते म्हणाले.
सिद्धरामय्यांनी स्पष्ट केलं की, ते हिंदू धर्माचं पालन करणारे आणि हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहणारे हिंदू आहेत. हिंदुत्व आणि हिंदू धर्म भिन्न आहे. मला नेहमीच भाजपनं हिंदुत्वविरोधी दाखवलं. मी हिंदुत्वविरोधी नाहीये. मी सुद्धा एक हिंदू आहे, पण मी मनुवाद आणि हिंदुत्वविरोधी आहे, असं त्यांनी सांगितलं.
कोणताही धर्म खून किंवा हिंसेला प्रोत्साहन देतो का?
एका मेळाव्याला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं की, कोणताही धर्म खून किंवा हिंसेला प्रोत्साहन देतो का? पण मनुवाद आणि हिंदुत्व हत्या, हिंसा आणि भेदभावाला प्रोत्साहन देतं. हिंदू आणि हिंदुत्वात हाच फरक आहे, असं त्यांनी नमूद केलं. सिद्धरामय्यांनी हिंदुत्वावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी, 8 जानेवारीलाही त्यांनी आपण हिंदू आहोत, पण हिंदुत्वाला विरोध करतो, असं ठामपणे सांगितलं होतं.