विराटचा फोन हरवल्यावर ट्वीटरवर भन्नाट रिस्पॉन्स.. 'नथिंग' म्हणतं आम्ही देतो नवा फोन..

विराटचा फोन हरवल्यावर ट्वीटरवर भन्नाट रिस्पॉन्स.. 'नथिंग' म्हणतं आम्ही देतो नवा फोन..

belgavkar.com | belgaum | belgavkar

हा एखादा स्टंट असून एखाद्या फोनच्या....

भारतीय संघाचा माजी भारतीय कर्णधार विराट कोहली याचा नवा-कोरा फोन हरवल्याची माहिती त्याने स्वत: ट्वीट शेअर करत दिली. विराटचं हे ट्वीट अगदी काही वेळातच तुफान व्हायरल झालं, ज्यानंतर नेटकऱ्यांसह अनेक बड्या कंपन्यांनी देखील रिप्लाय केला आहे. यात खासकरुन झोमॅटो, टाटा, झी5 अशा काहींचे रिप्लाय देखील व्हायरल होत आहेत. विराटनं ट्वीटमध्ये लिहिलं की, 'तुमचा नवा फोन बॉक्समधून काढण्यापूर्वीच हरवणं, याहून वाईट काहीच नसेल, कोणी माझा फोन पाहिला का?' 
दरम्यान विराटच्या या ट्विटवर येणाऱ्या रिप्लायमध्ये झोमॅटोने लिहिलं आहे की, 'तुम्ही हवंतर आमच्याकडून आईसस्क्रीम मागवू शकता, वहिनींचा फोन यासाठी तुमची मदत करु शकतो. झोमॅटोच्या रिप्लायवर इतरही नेटकऱ्यांनी भन्नाट रिप्लाय दिले आहेत. तर टाटा निओने रिप्लायमध्ये लिहिलं आहे की, जे होणार असेल त्याला आपण काही करु शकत नाही, पण आम्हाला कोणता फोन होता ते थेट मेसेज करुन सांगा आमच्याकडे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर नथिंग या नव्याने मार्केटमध्ये आलेल्या मोबाईल कंपनीनेही विराटला फोन देऊ केला आहे.  याशिवाय एका युजरने मिश्किलपणे लिहिलं आहे, आता यामुळे का होईना खेळावर लक्ष लागून राहिल.  तर अनेक नेटकरी हा एखादा स्टंट असून एखाद्या फोनच्या जाहिरातीचा याशी संबंध असेल असं म्हटलं जात आहे.  

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

विराटचा फोन हरवल्यावर ट्वीटरवर भन्नाट रिस्पॉन्स.. 'नथिंग' म्हणतं आम्ही देतो नवा फोन..
हा एखादा स्टंट असून एखाद्या फोनच्या....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm