belgaum-बेळगाव-belgaum-kankumbi-maulidevi-yatrotsav-from-today-बेळगाव-belgavkar-belgaum-kankumbi-20230241.jpg | बेळगाव : कणकुंबी माउलीदेवी यात्रोत्सव | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : कणकुंबी माउलीदेवी यात्रोत्सव

belgavkar.com | belgaum | belgavkar

सीमेवरील कणकुंबी आणि चिगुळे येथील श्री माउलीदेवी आणि त्यांच्या भगिनींच्या भेटीचा सोहळा 12 वर्षांनी

बेळगाव : मलप्रभा नदी उगमस्थानावरील कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवरील कणकुंबी आणि चिगुळे येथील श्री माउलीदेवी आणि त्यांच्या भगिनी कोदाळी, गुळंब, कळसगादे, केंद्रे-वीजघर या सर्व देवींच्या भेटीचा सोहळा 12 वर्षांनी होत आहे. दि. 8 ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या यात्रोत्सवाला जवळपासच्या गोवा व महाराष्ट्र राज्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने देवस्थान कमिटी, पंचमंडळ, ग्रामस्थ व ग्राम पंचायतीने जोरदार तयारी केली आहे. बुधवार दि. 8, 9 व 10 असे तीन दिवस गावातील विविध मंदिरांचा धार्मिक विधी तर दि. 12 रोजी माउली देवींची भेट म्हणजे माउली यात्रोत्सव होणार आहे.
आठ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवातील दि. 11 रोजी कोदाळी, गुळंब, कळसगादे, केंद्रे-वीजघर या माउलीदेवी चिगुळे येथील श्री माउलीदेवीच्या भेटीसाठी मुक्कामाला येतात. तर दि. 12 रोजी या सर्व माउलीदेवी चिगुळे गावाहून कणकुंबी येथील माउलीदेवीच्या भेटीसाठी कणकुंबी-चिगुळे रस्त्यादरम्यान सर्व माउलीदेवींच्या भेटीचा नयनरम्य सोहळा होतो. यात्रोत्सवात आठ दिवस अभिषेक व इतर धार्मिक विधी, महाप्रसाद, करमणुकीसाठी नाटक, पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम व पूजा अर्चा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
यात्रा कालावधीत दुकाने मांडण्यासाठी ट्रस्ट कमिटीने स्वतंत्र व्यवस्था केलेली असून परवानगीशिवाय दुकाने मांडता येणार नाहीत. भक्तांसाठी बेळगाव व खानापूर येथून स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून ग्रामपंचायतीनेसुद्धा मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी विशेष उपाययोजना केलेली आहे.