news.jpg | वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन ला मारहाण | belgaum news | belgavkar बेळगावकर

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन ला मारहाण

belgavkar

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना भारतीय जनता पक्ष व शिवसेना च्या नगरसेवकांनी शुक्रवारी चोप दिला.
हा प्रकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घडला.समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावाबद्दल चर्चा करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. परंतु, माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे ही सभा रद्द करून वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची भूमिका महापौरांनी मांडली. त्यानुसार, श्रद्धांजली सभेला करण्यात आली. भाजपचे नगरसेवक दिलीप थोरात यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन हे बोलण्यासाठी उभे राहिले, पण महापौरांनी त्यांना खाली बसवले. वाजपेयी यांच्या कार्यावरील चित्रफित दाखवली जाणार आहे, ती पाहा, त्यानंतर बोला, असे महापौरांनी मतीन यांना सांगितले. ही चित्रफित सुमारे २० मिनिटे दाखवण्यात आली. त्यानंतर सय्यद मतीन हे बोलण्यास उभे राहिले. ते म्हणाले,
'बाबरी मशिदीचे प्रकरण आम्ही अद्याप विसरलो नाही, त्यामुळे वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास आमचा विरोध आहे.'
हे ऐकताच भाजपचे नगरसेवक दिलीप थोरात हे मतीन यांच्या दिशेने धावून गेले. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे गटनेते प्रमोद राठोड देखील मतीन यांच्यावर धावून गेले, त्यांनी मतीन यांच्या कानाखाली लगावली. त्यानंतर भाजपचे नगरसेवक मतीन यांच्यावर तुटून पडले. नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी मतीन यांना चपलेने झोडपले. अदवंत यांच्या पाठोपाठ उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक रामेश्वर भादवे, शिवाजी दांडगे, शिवसेनेचे सभागृहनेते विकास जैन, स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य, मोहन मेघावाले आदी नगरसेवक मतीन यांच्या दिशेने धावून गेले. सर्वांनी मतीन यांना मारहाण केली. यावेळी सभागृहातील एमआयएमचे अन्य नगरसेवक शांत राहिले, त्यांनी प्रतिकार केला नाही. नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी लाथ मारून मतीन यांना खाली पाडले, त्यामुळे मतीन यांच्या डोक्याला मार लागला. सुरक्षा रक्षकांनीकडे करून मतीन यांना सभागृहाच्या बाहेर नेले. मतीन यांच्या पाठोपाठ एमआयएमचे नगरसेवकही सभागृहाच्या बाहेर गेले.
'वंदेमातरम्' ला केला होता विरोध
सय्यद मतीन यांनी यापूर्वी पालिका सभागृहात वंदेमातरम् म्हणण्यास विरोध केला होता. त्यावेळीही पालिकेच्या सभागृहात धिंगाणा झाला होता. मतीन यांच्यासोबत जफर बिल्डर या एमआयएमच्या नगरसेवकाने सभागृहात खुर्च्या फेकल्या होत्या. त्यापैकी एक खुर्ची तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांना लागली होती. 'वंदेमातरम्'ला विरोध केल्यामुळे घडमोडे यांनी मतीन यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस आयुक्तांना केली होती. आयुक्तांनी तसा प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे.
17 ऑगस्ट 2018
'होय केला मी विरोध..हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते'; MIM नगरसेवक मतीन यांची प्रतिक्रिया
ते म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला लोकशाही पद्धतीने आम्ही त्याला विरोध केला. मात्र, भाजपचे नगरसेवकांनी थेट माझ्यावरच हल्ला चढवला. दहा-दहा जणांनी हल्ला करून सभागृहाचा अवमान केला, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते. मग त्यांना दाखवले असते, हल्लाखोर भाजपच्या नगरसेवकांवर महापौरांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली केली आहे.
18 ऑगस्ट 2018
MIM नगरसेवक मतीन यांना अटक
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावर भाषण करण्यास नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात आली आहे. नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नगरसेवक मतीन यांनी सभागृहातून पळ काढला होता. यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या होत्या.
22 आॅगस्ट
सय्यद मतीनला 1 वर्षाचा तुरुंगवास...
एपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई.वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन औरंगाबाद पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए १९८१) मतीन यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच वर्षभर जामीनही मिळणार नाही.
belgaum marathi
Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm