belgavkar
ज्या शाळेत मुले विद्या शिकण्यासाठी व आपले भविष्य घडविण्यासाठी जातात त्याच शाळेत मुलांकडून शौचालय व खासगी वाहने स्वच्छ करण्याची कामे करून घेतली जात आहेत. शौचालय व खासगी वाहने स्वच्छ करण्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. हे सर्व फोटो गोकाक(जिल्हा - बेळगाव) तालुक्यातील बडीगवाद गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील असून ह्या फोटोमुळे ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त केला आहे व त्या शाळेतील संबंधीत शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.