belgaum-बेळगाव-belgaum-itbp-jawan-from-halbhavi-camp-new-wantmuri-missing-from-railway-station-belgavkar-belgaum-20221227.jpg | बेळगाव : जवान बेपत्ता | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : जवान बेपत्ता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हालभावी कॅम्प, न्यू वंटमुरीतील आयटीबीपीचा जवान रेल्वेस्थानकातून बेपत्ता झाल्याची फिर्याद कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. सुरेशकुमार पुरणचंद (वय 37) असे त्यांचे नाव आहे. सुरेशकुमार हे आयटीबीपी 44 बटालियनमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत होते.
30 नोव्हेंबरला साडेआठच्या दरम्यान रेल्वेस्थानकावर ते सेवेवर गेले होते. त्यानंतर ते पुन्हा परतलेच नाहीत. त्यांची उंची 170 सेंटिमीटर असून, अंगावर खाकी पँट आणि खाकी शर्ट आहे. त्यांना हिंदी भाषा अवगत असून, वरील जवानाबद्दल कुणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कॅम्प पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.