belgaum-बेळगाव-belgaum-terrible-accident-of-group-education-officers-car-raibag-group-education-officer-traveling-when-the-car-overturned-due-to-a-sudden-tire-burst-belgavkar-belgaum-20221259.jpg | बेळगाव : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कारचा अपघात | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कारचा अपघात

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-रायबाग : रायबागच्या गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील प्रवास करत असलेल्या कारचा अचानक टायर फुटल्यामुळे कार पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रायबाग तालुक्यातील हुब्बरवाडी मंगसुळी-लक्ष्मेश्वर महामार्गावर घडली. अपघातात अरबॅग सुटल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी कार उलटली. त्यामधे प्रवास करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील जखमी झाल्या आहेत. ते त्यांच्या कार्यालयातून हुक्केरी येथे जात असताना ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी दुसऱ्या वाहनातून बेळगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.