belgaum-बेळगाव-belgaum-two-people-were-killed-in-an-accident-on-mudhol-nipani-highway-18-near-gurlapur-belgavkar-belgaum-20221217.jpg | बेळगाव : महामार्गावर अपघातात बहीण-भाऊ ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : महामार्गावर अपघातात बहीण-भाऊ ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुधोळ-निपाणी महामार्गावर अपघात;

बेळगाव-मुडलगी : मुधोळ-निपाणी महामार्ग 18 गुर्लापूरजवळ (ता. मुडलगी) झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. धारवाडहून कप्पलगुद्दीकडे निघालेली टाटा टियागो लोकापूरहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या एर्टिगा कारला धडकून हा भीषण अपघात झाला. रायबाग तालुक्यातील कप्पलगुद्दी गावातील रहिवासी दुंडप्पा अडिवेप्पा बुडिगेरे (34) आणि त्यांची बहीण भाग्यश्री नवीन कंबार (22) अशी मृतांची नावे आहेत.
अपघातातील इतर जखमींना गोकाक येथील उमराणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री धारवाडहून मूळ गावी जात असताना दोन कारमध्ये धडक झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुंडप्पा व भाग्यश्री यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याकडे जाणाऱ्या कारमधील सहा जणांपैकी चार जणांना गंभीर दुखापत झाल्याने गोकाक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पीएसआय एच. वाय. बलदंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मयत दुंडप्पा हा अथणी तालुका पंचायतच्या कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते.