shraddha-walker-murder-case-if-you-have-the-guts-find-shraddhas-head-and-weaponaftabs-open-challenge-to-the-police-20221249.jpeg | दम असेल तर श्रद्धाचे शिर आणि हत्यार शोधून दाखवा… आफताबचे पोलिसांना खुले आव्हान | belgaum news | belgavkar बेळगावकर

दम असेल तर श्रद्धाचे शिर आणि हत्यार शोधून दाखवा… आफताबचे पोलिसांना खुले आव्हान

belgavkar.com | belgaum | belgavkar

पोलिसांना अद्याप श्रद्धाचे शिर आणि शरीर सापडले नाही

नवी दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या हत्येतील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, मात्र असे असतानाही अद्याप श्रद्धाचे शिर आणि धड शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यातच आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. आफताबच्या सांगण्यावरुन छतरपूर आणि मेहरौलीच्या जंगलातून आतापर्यंत 13 हून अधिक हाडे शोधण्यात आली आहेत. दरम्यान, ''मी श्रद्धाला मारले आहे, हिम्मत असेल तर तिचे सर्व अवयव आणि हत्यारे जप्त करा, असे आफताबने म्हटले आहे.'' आफताबने पोलिसांना हे आव्हान एकदा नव्हे तर अनेकदा दिले आहे. आरोपीच्या या आव्हानामुळे दिल्ली पोलीस अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत.
पोलीस श्रद्धाच्या शिर आणि शरीरासाठी सातत्याने तपास करत आहेत. छतरपूरच्या जंगलातून जप्त केलेला जबडा आणि तिचे इतर तुकडे पोलिसांना आढळून आले आहे. परंतु श्रद्धाला मारण्यासाठी वापरलेले हत्यार अद्याप पोलिसांना मिळाले नाही. पोलिसांनी स्वयंपाकघरातून 5 चाकू जप्त केले असले तरी. याचा उपयोग आरोपींने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी केला होता.