httpif-you-meet-me-outside-i-will-kill-you-like-a-dog-threat-to-marathi-actor-acting-in-drishyam-20221227.jpeg | कुत्र्यासारखा मारेन...! दृश्यम 2 चित्रपटातील मराठी अभिनेत्याला धमकी | belgaum news | belgavkar बेळगावकर

कुत्र्यासारखा मारेन...! दृश्यम 2 चित्रपटातील मराठी अभिनेत्याला धमकी

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण याचा ‘दृश्यम 2’ हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करणार असून अजय देवगण आणि इतर कलाकारांच्या भूमिकांना देखील प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. मात्र दृश्यम 2 मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणाऱ्या मराठी अभिनेत्याला मात्र धमक्या आणि शिवीगाळ करणाऱ्या फोन कॉलला सामोरे जावे लागत आहे. ‘दृश्यम 2’ चित्रपटात पोलिस अधिकारी गायतोंडेंच्या भूमिकेत असणारा मराठमोळा अभिनेता कमलेश सावंत याने या सिनेमात पोलिसांची भूमिका अगदी उत्तम वठवली असून त्यासाठी त्याचे कौतुक देखील होत आहे.
‘दृश्यम’मध्ये गायतोंडेने साळगावकर कुटुंबाला मारहाण केली आहे. त्यामुळेच त्याच्यावर प्रेक्षक भडकले आणि त्याला त्याच्या कामाची पोचपावती मिळाली. यासंदर्भात भाष्य करताना कमलेश सावंत म्हणाला, ”साळगावकर कुटुंबाची मारहाण केल्याने प्रेक्षक खूप भडकले होते. माझ्या एका पोस्टवर एका नेटकऱ्याने बाहेर भेटलास तर कुत्र्यासारखा मारेन, अशी कमेंट केली होती. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे”.