fifa-world-cup-2022-with-only-eight-teams-left-in-the-fifa-world-cup-know-who-will-face-whom-in-the-quarter-finals-20221213.jpg | FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषकात आता फक्त 8 संघ उरले | belgaum news | belgavkar बेळगावकर

FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषकात आता फक्त 8 संघ उरले

belgavkar.com | belgaum | belgavkar

जाणून घ्या उपांत्यपूर्व फेरीत कोण कोणाशी भिडणार?

फ्रान्स, ब्राझील, पोर्तुगाल आणि इंग्लंड यांसारखे मोठे संघ उपांत्यपूर्व फेरीत

फिफा विश्वचषक 2022 मधील शेवटचे 16 सामने संपले आहेत. आता या स्पर्धेत फक्त 8 संघ उरले आहेत. आता विजयी संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचबरोबर या स्पर्धेत पराभूत चार संघांचा प्रवास संपणार आहे. फ्रान्स, ब्राझील, पोर्तुगाल आणि इंग्लंड यांसारखे मोठे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत आणि आता ते विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.

क्रोएशिया विरुद्ध ब्राझील, शुक्रवारी 9 डिसेंबरला, रात्री 8.30 वाजता, एज्युकेशन सिटी स्टेडियमवर होणार आहे. क्रोएशियाने साखळी सामन्यात मोरोक्को याच्याविरुद्ध गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्यानंतर कॅनडाला 4-1 हरवले. परत त्यानंतर बेल्जियमविरुद्ध गोलशून्य बरोबरीत सुटला. अंतिम 16 मध्ये जपानविरुद्ध 1-1 बरोबरीत झाल्यानंतर पेनल्टीशूट आऊटमध्ये जिंकला होता.
नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना, शनिवारी 10 डिसेंबरला, दुपारी 12:30 वाजता, लुसेल स्टेडियमवर होणार आहे. नेदरलँड्सने साखळी सामन्यात सेनेगलला 2-0ने हरवले होते. त्यानंतर इक्कवेडोर बरोबर 1-1 अशा बरोबरीत सामना सुटला. त्यानंतर यजमान कतारला 2-0ने पराभूत केले. अंतिम 16 मध्ये मेरिकेला 3-1ने नमवले.

पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को, शनिवारी त्याच दिवशी 10 डिसेंबर, रात्री 8:30 वाजता अल थुमामा स्टेडियमवर होणार आहे. पोर्तुगालने साखळी सामन्यात 3-2 ने घानाविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर उरुग्वेला 2-0ने हरवले. पण साऊथ कोरिया विरुद्ध 2-1 ने पराभव पत्करावा लागला. अंतिम 16 मध्ये स्वित्झर्लंडला 6-1 ने मात दिली.
इंग्लंड विरुद्ध फ्रान्स रविवारी 11 डिसेंबरला दुपारी 12.30 वाजता अल बायत स्टेडियमवर सामना होणार आहे. साखळी सामन्यात त्यांनी इराणला 6-2 नमवले होते. अमेरिकेसोबत गोलशून्य बरोबरी झाली होती तर वेल्सला 3-0 ने हरवले होते. अंतिम 16 मध्ये त्यांनी सेनेगलला हरवले होते.
ब्राझीलने साखळी सामन्यात सर्बियाला 2-0 ने हरवले होते. त्यानंतर स्वित्झर्लंडला 1-0ने हरवले होते. पण कॅमेरूनकडून बलाढ्य ब्राझिलचा 1-0 असा पराभव झाला होता. अंतिम 16 मध्ये साऊथ कोरियाला 4-1 ने नमवले होते.

मोरोक्कोने साखळी सामन्यात क्रोएशिया विरुद्ध गोलशून्य बरोबरीत केली होती. त्यानंतर बेल्जियमला 2-0 ने हरवले तर कॅनडाला 2-1 नमविले. अंतिम 16 मध्ये त्यांनी माजी विश्वविजेते स्पेनला पेनल्टी शूट आऊटमध्ये 3-0 असे हरवले.
फ्रान्सने साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 4-1 ने हरवले. त्यानंतर त्याच गटात डेन्मार्कला त्यांनी 2-1 ने हरवले होते. गटातील शेवटच्या सामन्यात ट्युनिसीयाकडून माजी विश्वविजेत्यांना धक्कादायक 1-0 ने पराभव स्विकारावा लागला होता. अंतिम 16 मध्ये त्यांनी शेजारील देश पोलंडला 3-1 ने हरवले.

अर्जेंटिनाने साखळी पहिलाच सामन्यात सौदी अरेबियाकडून 2-1 असा पराभव ओढवून घेतला होता. नंतर घानाला 3-2 ने हरवले. त्यानंतर मेक्सिकोला 2-0ने नमविले होते. अंतिम 16 मध्ये ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवले होते.