संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. गुजरातमध्ये 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान पार पडलं. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षही राज्याच्या राजकारणार प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष आहे. एक्झिट पोलनुसार, नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचा फायदा होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या भाजपाच्या हाती येतील. भाजपा आपला 2002 मधील 127 जागांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसचा 1985 मधील 149 जागांचा रेकॉर्ड मोडणं त्यांना शक्य होणार नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसला ही मतं मिळाली होती.