7.6 कोटींचे दागिने, सोन्याचा मोबाईल-कार; अशी लक्झरी आयुष्य जगतायत ‘Golden Guys’

7.6 कोटींचे दागिने, सोन्याचा मोबाईल-कार;
अशी लक्झरी आयुष्य जगतायत ‘Golden Guys’

belgavkar.com | belgaum | belgavkar

सनी वाघचोरे आणि बंटी गुर्जर

लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की मी इतके सोने कसे घालतो

'बिग बॉस 16' प्रत्येक सीझनप्रमाणेच हिट ठरला आहे. या सीझनमध्ये पहिल्या वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये गोल्डन गाईज या नावाने प्रसिद्ध सनी वाघचोरे आणि बंटी गुर्जर यांची एन्ट्री झाली आहे. सोशल मीडियावर या दोघांनी धुमाकुळ घातला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. सनी आणि बंटी कोट्यवधी रुपयांचे सोने परिधान करतात आणि अतिशय लक्झरी लाईफ जगतात. 'बिग बॉस 16' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीपूर्वी सनीने आपल्या आयुष्याविषयी सांगितले.
'बिग बॉस 16' मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेणाऱ्या सनीचे पूर्ण नाव सनी नानासाहेब वाघचौरे आहे आणि बंटीचे पूर्ण नाव संजय (बंटी) गुर्जर आहे. सनी आणि बंटी खूप चांगले मित्र आहेत, तसेच ते अनेक ठिकाणी एकत्र जातात. सनी आणि बंटी हे फिल्म फायनान्सर आणि निर्माते आहेत. तो अनेक प्रसंगी सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि इतर अनेक सेलिब्रिटींसोबत दिसतो. त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत त्याला विचारले असता त्याने याबाबत बोलण्यास नकार दिला. “आम्ही दोघे पुण्याचे रहिवासी आहोत. मी आणि बंटी लहानपणापासून एकत्र आहोत आणि आम्हा दोघांनाही लहानपणापासूनच सोने घालण्याची आवड आहे. आम्ही मित्र असू शकतो पण आमच्यात भावासारखं प्रेमदेखील आहे. आम्ही नेहमी एकत्र राहतो. आमच्यातील असलेल्या प्रेमापोटी लोकांनी आम्हाला 'गोल्डन गाईज' हे नाव दिलेय.
किती सोनं घालतात?
सनीने सांगितले की, “लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की मी इतके सोने कसे घालतो. म्हणून मी सांगू इच्छितो की जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादे काम करत असाल तर तुम्हाला त्याची सवय होते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जीममध्ये व्यायाम करण्यासाठी जात असेल आणि तो 100 किलो वजन उचलत असेल, तर त्याला पाहून नवीन लोक म्हणतील की तो इतका वजन कसा उचलतोय? मग तोच माणूस हळूहळू सराव करेल तेव्हा तो स्वतः 100 किलो वजन उचलू शकेल. तसंच मीही लहानपणापासून सोनं घातलं आहे. कालांतराने मी सोन्याच्या दागिन्यांचे वजन वाढवले. आजतकशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्याने यावर भाष्य केले. मी आज जवळपास 7 किलो सोनं घालतो आणि बंटी 4-5 किलो सोनं घालतो. तुम्हाला ऐकायला अजब वाटेल की इतकं वजन घेऊन कोणी कसं चालू शकतं. पण त्यात कोणतीही समस्या येत नसल्याचं सनीनं सांगितलं.
लक्झरी कार्सचीही आवड
गोल्डन गाईजकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. मुंबई-पुण्याच्या रस्त्यांवर अनेकवेळा त्यांची सोन्याची चमकणारी कार पाहण्यासाठी गर्दी होते. त्यांच्या गाडीसोबत अंगरक्षकांची दोन वाहनेही आहेत. त्याच्याकडे जग्वार एक्सएफ कारही आहे. त्याच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे 89 लाख आहे. कारच्या बॉडीशिवाय टायर आणि इंटिरिअरही सोन्याच्या मिश्रीत धातूपासून बनवलेले आहेत. याशिवाय सनी आणि बंटी यांच्याकडे टॉप-ऑफ-द-लाइन ऑडी Q7 देखील आहे. जी त्याने काही वर्षांपूर्वीच खरेदी केली होती. या दोघांची ही आवडती कार आहे. या कारच्या बेस व्हेरिअंटची किंमत सुमारे 83 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. गोल्डन गाईजकडे मर्सिडीज बेंझ ई-क्लास देखील आहे ज्याच्या नंबर प्लेटवर त्यांचे नाव लिहिलेले आहे. ई-क्लास मर्सिडीज ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या लक्झरी कारपैकी एक आहे. त्याची किंमत 67-87 लाखांच्या दरम्यान आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

7.6 कोटींचे दागिने, सोन्याचा मोबाईल-कार; अशी लक्झरी आयुष्य जगतायत ‘Golden Guys’
सनी वाघचोरे आणि बंटी गुर्जर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm