ind-vs-nz-1st-odi-live-153-kph-by-umran-malik-fastest-ball-of-the-match-at-the-end-of-25-overs-new-zealand-have-scored-1153-video-20221108.jpeg | IND vs NZ 1st ODI Live : वेगे वेगे धावू...! Umran Malik ने टाकला वेगवान चेंडू; | belgaum news | belgavkar बेळगावकर

IND vs NZ 1st ODI Live : वेगे वेगे धावू...! Umran Malik ने टाकला वेगवान चेंडू;

belgavkar.com | belgaum | belgavkar

किवी फलंदाज गार, Video

जम्मू-काश्मीर एक्स्प्रेस उम्रानने किवी फलंदाजांना आपल्या वेगाने भांबावून सोडले

शिखर धवन, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य उभे केले. संजू सॅमसन व वॉशिंग्टन सुंदर यांनी फटकेबाजी करताना उपयुक्त धावा जोडल्या. आजच्या सामन्यात उम्रान मलिक आणि अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांनी पदार्पण केले आणि त्यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत. जम्मू-काश्मीर एक्स्प्रेस उम्रानने आज किवी फलंदाजांना आपल्या वेगाने भांबावून सोडले. आजच्या सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू उम्रानने फेकला. वेगवान मारा करताना त्याने किवी फलंदाजांची बोलती बंद केलीच, शिवाय दोन धक्के देत दडपणही निर्माण केले. उम्रानने किवींचा सलामीवीर कॉनवे (24) आणि डॅरील मिचेल (11) यांची विकेट घेतली. त्याने आजच्या सामन्यात 153 kmph वेगवान चेंडू टाकला. 


शिखर धवन (72) आणि शुबमन गिल (50) या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना 124 धावांची भागीदारी केली, परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 9 चेंडूंच्या फरकाने दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर रिषभ पंत (15) व सूर्यकुमार यादव (4) हेही अपयशी ठरले आणि भारताची धावगती मंदावली. श्रेयस अय्यर (80) व संजू सॅमसन (36)  यांनी 77 चेंडूंत 94 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने सर्वांची वाहवाह मिळवली. त्याने 16 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारासह नाबाद 37 धावा केल्या. भारताने 7 बाद 306 धावा उभ्या केल्या. 
प्रत्युत्तरात न्यूझीलंडने सावध खेळ केला. फिन अॅलन व डव्हॉन कॉनवे ही जोडी विकेट टिकवून खेळत होती. त्यात युजवेंद्र चहलने फिनला जीवदान दिले, परंतु शार्दूल ठाकूरने त्याच षटकात फिनला (22) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानतर उम्रान मलिकने कमाल केली. उम्रानने किवींचा सलामीवीर कॉनवे (24) आणि डॅरील मिचेल (11) यांची विकेट घेतली. त्याने आजच्या सामन्यात 153 kmph वेगवान चेंडू टाकला.