fifa-world-cup-2022-brazil-serbia-richarlison-bicycle-20221132.jpeg | FIFA World Cup 2022 : ब्राझीलच्या रिचार्लीसनने मारली पहिली बायसिकल किक; Video Viral | belgaum news | belgavkar बेळगावकर

FIFA World Cup 2022 : ब्राझीलच्या रिचार्लीसनने मारली पहिली बायसिकल किक; Video Viral

belgavkar.com | belgaum | belgavkar

ब्राझीलवर सहाव्यांदा विश्‍वविजेता होण्याचा दबाव

फिफा वर्ल्डकप 2022 मधील संभाव्य विजेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीललने आपली वर्ल्डकप मोहिम विजयाने सुरू केली. ग्रुप-G च्या सामन्यात सर्बियाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लीसनने पहिली बायसिकल किक मारली आहे. या गोलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर फिफा वर्ल्ड कपच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय


दरम्यान, ब्राझीलच्या रिचार्लीसनने मारलेल्या कीकचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कीक मारल्यानंतर ब्राझीलच्या संघाने केलेला जल्लोष या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर रिचार्लीसनची ही पहिलीच बायसिकल किक होती. सन 2002नंतर ब्राझीलला विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. त्यामुळे सहाव्यांदा विश्‍वविजेता होण्याचा दबाव त्यांच्यावर असणार, हे निश्‍चित आहे. यंदाच्या स्पर्धेमध्ये ब्राझीलच्या संघात 16 युवा खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू पहिल्यांदाच विश्‍वकरंडकात सहभागी झाले आहेत.
विनिशियस ज्युनियर, रॉड्रिगो, राफिना, एडर मिलिटाओ, ब्रुनो गिमरेस, अँथोनी या खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी यावेळी मिळणार आहे. विनिशियस याला ब्राझीलच्या अंतिम संघात स्थान देण्यात येईल की नाही, याबाबत मुख्य प्रशिक्षक टिटे यांनी मौन बाळगले आहे. अंतिम संघात स्थान दिल्यास तो नेमार, रिचर्लीसन व राफिना यांच्यासोबत आक्रमक फळीत खेळेल.