desi-jugad-man-starts-small-shop-on-the-rooftop-of-maruti-suzuki-800-car-viral-on-social-media-20221104.jpeg | इच्छा तिथे मार्ग....! दुकानासाठी जागा नाही म्हणून त्याने केला देसी जुगाड, Viral फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव | belgaum news | belgavkar बेळगावकर

इच्छा तिथे मार्ग....! दुकानासाठी जागा नाही म्हणून त्याने केला देसी जुगाड, Viral फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

belgavkar.com | belgaum | belgavkar

भावाने केला जगात भारी जुगाड, 'ही टेक्नॉलॉजी देशाबाहेर जाता कामा नये', लोकांची प्रतिक्रिया

आपल्याला दोनवेळचं अन्न मिळावं, पोटाची खळगी भरावी म्हणून प्रत्येकजण काहीना-काही करत असतो

भारतातील लोकं प्रचंड क्रिएटिव्ह आहेत यामध्ये काहीच शंका नाही. अशाच एका क्रिएटिव्ह माणसाने गाडीचा वापर करत जुगाडू दुकान सुरु केलं आहे. एका मारुती गाडीचं छप्पर कापून या माणसाने दुकान थाटलंय. हा जुगाड आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे.  भारतात प्रत्येकामध्ये काहीना-काही कौशल्य नक्कीच आहे, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. भारत आणि भारतातील देशी जुगाड कायम सर्वांचं लक्ष वेधून घेतात. जेंव्हा एखाद्याकडे काहीच मार्ग राहत नाही, तेंव्हा अशी काहीतरी गोष्ट घडते ज्याने तात्पुरता का होईना तोडगा निघतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून असे जुगाडू व्हिडीओ व्हायरल  होतात. अशापैकी अनेकांना बड्या उद्योगपतींकडून आर्थिक साहाय्य देखील मिळतं. आर्थिक मदत करण्याची कित्येक उदाहरणं आपण पाहिली आहेत. सध्या एका अशाच जुगाडू माणसाची प्रचंड चर्चा आहे. या माणसाने असा भन्नाट जुगाड केला आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या माणसाने आपल्या कारचं दुकानात रूपांतर केलंय. ही टेक्नॉलॉजी देशाबाहेर जाता काम नये, असं आता जुगाड पाहून नेटकरी बोलतायत.
या देशी जुगाडचा व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल झाले आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ IPS अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे. याखाली 'इनोव्हेटिव्ह' आहे असं लिहिलं आहे. फेसबुकवर देखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावरही अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी हा जुगाड आधी पहिला नव्हता असं म्हंटलं आहे. बरं हा वरचा फोटो पाहून तुम्हाला ही फोटोशॉपची कमाल वाटू शकते. मात्र तसं नाही. खालील व्हिडीओ पाहा.  

आपल्याला दोनवेळचं अन्न मिळावं, पोटाची खळगी भरावी म्हणून प्रत्येकजण काहीनाकाही करत असतो. अशात मध्ये कुठलाही अडथळा आला तर असे जुगाड  जन्माला येतात. या माणसानेही थेट कारच्या छप्परावर दुकान सुरु करून सर्वांनाच चक्रावून टाकलं आहे. 
वरील व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकतात की या माणसाने कारच्या टपावर कशा पद्धतीने एक लहानसं दुकान सुरु केलं आहे. टपरीसारख्या दिसणाऱ्या या दुकानात पान, तंबाखू, सिगारेट, बिस्किटं अशा लहानसहान गोष्टी पाहायला मिळतायत. या माणसाने कारच्या टपावर एक लोखंडी टपरी बनवली आहे. त्याने टपावरचा पात्र देखील काढलेला दिसतो जेणेंकडून या दुकानदाराला त्याच्या जुगाडू दुकानात जाता येईल. या व्हिडिओवर विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतायत.  हा जुगाड उत्तर प्रदेशातील लखनौमधील असल्याचं समजतंय. तुम्हला या जुगाडाबाबत काय वाटतं, नक्की कळवा.