viral-video-of-a-man-accused-of-raping-minor-let-off-with-sit-ups-in-bihar-20221139.jpg | पाच उठाबशा काढ आणि जा...! बलात्काराच्या आरोपीला अजब शिक्षा, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप | belgaum news | belgavkar बेळगावकर

पाच उठाबशा काढ आणि जा...! बलात्काराच्या आरोपीला अजब शिक्षा, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

belgavkar.com | belgaum | belgavkar

बलात्काराच्या आरोपीला पाच उठाबशा काढायला लावल्या;

पंचायतीची अजब शिक्षा

बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला पंचायतीने अजब शिक्षा दिली. पंचायतीने आरोपीला पाच उठाबशा काढायला सांगत नंतर सोडून दिलं. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. नवदा जिल्ह्यातील कन्नौज गावात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पोल्ट्री फार्मवर नेऊन बलात्कार केला होता. मात्र पंचायतीने आरोपीला पोलिसांकडे न सोपवण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, आरोपी बलात्काराचा दोषी असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. मुलीला एका निर्जनस्थळी नेलं असल्याने पंचायतीने आरोपीला ही शिक्षा सुनावली.

पोलीस अधीक्षक गौरव मंगला यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. दरम्यान हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचीही पोलीस चौकशी करणार असून, कारवाईची शक्यता आहे.