बेळगाव : दोघांना अटक, भाग्यनगर पहिला क्रॉस येथील बोळात एका तरुणावर प्राणघातक हल्ला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : क्षुल्लक कारणावरुन भाग्यनगर पहिला क्रॉस येथील बोळात एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुरुवारी टिळकवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अशिश बाबाजी शेनवी (वय 33, रा. भाग्यनगर पहिला क्रॉस टिळकवाडी) असे जखमीचे नाव आहे. राजू करडे (रा. जेरे गल्ली) आणि प्रशांत सांबरेकर (रा. मारुती गल्ली, अनगोळ) अशी दोघांना अटक केलेल्यांची नावे असून जिल्हा रुग्णालयाच वैद्यकिय तपासणी करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
या प्रकरणी राजू अण्णा आणि राजू करडे (दोघेही रा. बेळगाव), प्रशांत सांबरेकर यांच्यासह अन्य काही संशयीताविरोधात टिळकवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल दाखल झाला आहे. या प्रकरणी त्याचे वडील बाबजी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अशिश हा मोटार दुरुस्त करण्यासाठी दुपारी घरातून बाहेर गेला होता. बुधवारी रात्री मोटार सायकलवरुन भरधाव वेगाने येणाऱ्यांना अशिश आणि त्याचा मित्र पवणने 'सरळ मोटार सायकल चालवा' असे सांगितल्याने त्यांनी दोघाबरोबर वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच फोन करुन तिघा मित्रांना बोलावून घेतले. त्यावेळी पाच जणांनी अशिशला सोमवारपेठ येथील बोळात ओढून नेऊन लाथा बुक्यानी तसेच मुष्ठीने मारहाण केली.