basavraj-bommayi-bgm.jpg | बेळगाव : बेळगावमध्ये भव्य ऑटोमोबाईल व्यवसाय स्थापण्यासाठी प्रोत्साहन | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : बेळगावमध्ये भव्य ऑटोमोबाईल व्यवसाय स्थापण्यासाठी प्रोत्साहन

belgavkar.com | belgaum | belgavkar

500 एकर जागेत फाउंड्री आणि हायड्रोलिक्स इंडस्ट्रियल इस्टेट / पार्क

बेळगाव : बेळगावमध्ये भव्य ऑटोमोबाईल व्यवसाय स्थापण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच 500 एकर जागेत फाउंड्री आणि हायड्रोलिक्स इंडस्ट्रियल इस्टेट / पार्क विकसित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी व आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने गुरुवारी बेंगळूरु येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोम्मई बोलत होते.
बेळगावातील फाउंड्री व हेड्रोलिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने फाउंड्री पार्क स्थापन करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेऊन जागेची पाहणी करून भूसंदपान करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. एमएसएमईना प्रदूषण नियंत्रण मंडळ शुल्क आकारत असून ते शुल्क भरमसाट आहे. यावर विचार व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना केली. बेळगाव जिल्ह्यात 100 खाटांचे ईएसआयसी रुग्णालय उभारण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.